गाजराची भाजी

#myrecipe
By Harshita Gupta

Feb, 27th

639

Servings
4 persons
Cook Time
15 minutes
Ingredients
8 - 10

Ingredients

  • 5 ते 6 गाजर
  • एक मिरची
  • छोटा चमचा मोहरी
  • एक छोटा चमचा जिरे
  • गूळ थोडासा
  • दाण्याचा कूट
  • एक चमचा तेल
  • थोडी कोथिंबीर
  • चवी नुसार मीठ
  • लिंबाचा 5 थेंब रस

Instructions

  • गाजर धुऊन बारीक चिरून घेणे त्या नंतर मंद आचेवर कढई गॅसवर ठेऊन त्यात एक चमचा तेल टाकणे त्यात मोहरी जिरे टाकणे हिंग टाकणे
  • मोहरी तडतडली की त्यात गाजराचे तुकडे टाकणे अर्धी वाटी पाणी टाकणे त्यात थोडे दाण्याचे कूट टाकणे गूळ व मीठ चवीनुसार टाकणे त्यावर झाकण ठेवावे
  • पाच मिनाटने गॅस बंद करून ठेवणे त्या नंतर सर्व्ह करा